Mumbai
Maximum & Minimum First Innovation & Inventions Literature Marathons

MOST MARATHI POETIC VRUTTA INNOVATION IN A POETIC SERIES ON MOTHER

Vrutta World Record
Most Marathi Poetic Vrutta Innovation in A Poetic Series on Mother World Record

This is to certify that SHRI. VIJAY JOSHI (VIJO) has successfully achieved the remarkable literary feat of composing a unique and inspiring series of Marathi poems (Characteristic Lines) on the IMPORTANCE OF MOTHER IN 51 DIFFERENT MARATHI VRUTTA (Poetic Metres) and set a new World Record on 1st June 2026 at Dombivli, Maharashtra, India. The word  “VRUTTAI”  (Vrutta + Aai) signifies the content on the subject of ‘Mother’ (Aai) has been creatively expressed across various poetic meters (Vrutta), hence the Project name is “Vruttai”. Poetic meter refers to the rhythmic structure of a verse, determined by the arrangement of stressed and unstressed syllables. In Marathi poetry, meter is known as “Vrutta”, and it plays a crucial role in shaping the flow and musicality of the poem. This extraordinary literary accomplishment demonstrates exceptional creativity, profound knowledge of Marathi prosody, mastery over traditional poetic structures.

“Congratulations on your extraordinary achievement! Your determination, perseverance, and dedication have earned you a well-deserved place in the World Records Book of India. Keep inspiring others with your remarkable accomplishments!”

25 DIFFERENT MARATHI VRUTTA (meter) as in below Link

Additional 26 to 51 DIFFERENT MARATHI VRUTTA (meter) as in below

  • २६) मदनतलवार (२-८-८-८-८-४)
  • २७) भवानी (२-८-८-८-४)
  • २८) वररमणी (८-८-८-८-८-२)
  • २९) तुन्दिल (८-८-८-८-६)
  • ३०) कपीवीर (८-८-८-८-४)
  • ३१) विजया (२-८-८-८-६)
  • ३२) अरुणप्रभा (२-८-८-८-२)
  • ३३) सन्तति (२-८-८-२)
  • ३४) कमललोचन (२-८-८-८-३)
  • ३५) लीलारति (२-८-८-३)
  • ३६) सुखराशी (६-६-६-६-४)
  • ३७) दासी (६-६-६-६)
  • ३८) धवलचन्द्रिका (६-६-६-२)
  • ३९) जीवनलहरी (६-६)
  • ४०) मदनरङ्ग (६-६-६-५)
  • ४१) मेनका  (गालगागा गालगागा गालगा)
  • ४२) देवप्रिया / कालगंगा  (गालगागा × ३ + गालगा)
  • ४३) राधा  (गालगागा × ३ + गा)
  • ४४) संयुत  (गागालगा × २)
  • ४५) आनंद  (गागालगा लगागा)
  • ४६) विद्युल्लता  (गागालगा लगागा गागालगा लगा)
  • ४७) लयग्राहि (गागाल × ३ + गागा)
  • ४८) तारामती (गागाल × ३ + गा)
  • ४९) वारकामिनी (गालगाल गालगाल गालगा)
  • ५०) देवराज (गालगाल गालगाल गालगाल गालगा)
  • ५१) पृथ्वी (लगाल ललगा लगा!ल ललगा लगागा लगा)

दुसरी आवृत्ती – एकूण २६  ते ५१ वृत्त (मे – २०२६)

२६) मदनतलवार ()

संसार मंदिरी मंद तेवते घरा सुखाला उजळत जाते आई,

ती नसता सोबत आठवणींची मनात हुरहुर तेव्हा कळते आई;

मी घरापासुनी दूर एकटा सुखास शोधत वणवण करतो जेव्हा,

असतात समोरी सर्व सुखे अन् गाडी घोडा, तरिही नसते आई

२७) भवानी ()

संसार मंदिरी घरा सुखाला उजळत जाते आई,

ती नसता सोबत मनात हुरहुर तेव्हा कळते आई;

मी सुखास शोधत दूर एकटा वणवण करतो जेव्हा,

असतात सुखे अन् गाडी घोडा, तरिही नसते आई

२८) वररमणी ()

घर देव्हारी मंद तेवते प्रकाश देते उजळत जाते संसारा आई,

आठवणींची मनात हुरहुर तेव्हा कळते, सोबत नसते आधारा आई;

सुखास शोधत भटकत फिरतो वणवण करतो दूर एकटा परदेशामधुनी,

असतो पैसा गाडी घोडा सर्व सुखे पण नसते सोबत आभारा आई

२९) तुन्दिल ()

घर देव्हारी मंद तेवते प्रकाश देते आई जळते संसारा,

आठवणींची मनात होते हुरहुर तेव्हा आई नसते आधारा;

वणवण करतो घरापासुनी दूर एकटा मी सुख जीवन शोधाया,

असतो पैसा गाडी घोडा सर्व सुखे पण आई नसते आभारा

३०) कपीवीर ()

घर देव्हारी मंद तेवते प्रकाश देते उजळत जाते आई,

सोबत नसता, आठवणींची मनात हुरहुर, तेव्हा कळते आई;

सुखास शोधत भटकत फिरतो दूर एकटा वणवण करतो जेव्हा,

असतो पैसा गाडी घोडा सर्व सुखे पण सोबत नसते आई

३१) विजया ()

संसार मंदिरी प्रकाश देते आई जळते संसारा,

कल्लोळ मनाशी होतो जेव्हा आई नसते आधारा;

मी घरापासुनी दूर एकटा सुख शोधाया वणवणतो,

असतात समोरी सर्व सुखे पण आई नसते आभारा

३२) अरुणप्रभा ()

जीवनी मंदिरी उजळत जाते संसारा आई,

कल्लोळ मनाशी सोबत नसता आधारा आई;

मी सुख शोधाया फिरतो वणवण परदेशामधुनी,

असतात समोरी सर्व सुखे, ना आभारा आई

३३) सन्तति ()

घर सुखास झटते संसारा आई

मन हुरहुर, नसता आधारा आई

मी फिरतो वणवण सुख शोधायाला

असतात सुखे, ना आभारा आई

३४) कमललोचन ()

संसार मंदिरी प्रकाश देते आई जळते इथे,

कल्लोळ मनाशी होतो जेव्हा आई नसते इथे;

मी वणवण फिरतो सुख शोधाया दूर दूर एकटा,

असतात समोरी सर्व सुखे पण आई नसते तिथे

३५) लीलारति ()

संसार मंदिरी आई जळते इथे

कल्लोळ मनाशी आई नसते इथे,

मी सुख शोधाया दूर एकटा फिरे,

मिळतात सुखे पण आई नसते तिथे

३६) सुखराशी ()

संसारी जात्यावर कष्टाने सुख देते आई,

नसताना सोबतीस मायेची उब देते आई;

शोधाया सुख सौख्या फिरलो मी दूर दूर देशा,

संपत्ती पैसा मिळतो हाती पण नसते आई

३७) दासी ()

संसारी जात्यावर कष्टाने सुख दळते,

सौख्याने आनंदे संसारी विरघळते;

शोधाया सुख पैसा फिरलो मी दूरवरी

सोबतीस नसताना आई मज आकळते

३८) धवलचन्द्रिका ()

संसारी जात्यावर दळते आई

नसताना सोबतीस कळते आई,

सौख्याच्या मागे मी गेलो फिरलो

संपत्ती मिळते पण नसते आई

३९) जीवनलहरी ()

सौख्याने दरवळते

संसारी विरघळते,

सोबतीस नसताना

आई मज आकळते

४०) मदनरङ्ग ()

संसारी मार्गावर कष्टाने धावते

दूर जरी असलो मी माय लळा लावते,

सौख्याच्या मागे मी दूर दूर धावतो

संपत्ती मिळते पण आई ना भेटते

४१) मेनका  (गालगागा गालगागा गालगा)

राबते आई घरा सांभाळते

मुक्त हस्ते देत जाते राबते,

खूप पैसा आज हाती खेळतो

अर्थ ना, आईविना भांबावतो

४२) देवप्रिया / कालगंगा  (गालगागा × + गालगा)

नित्यनेमे राबते आई घरा सांभाळते

सर्वकाही मुक्त हस्ते देत जाते राबते,

लोभमाया खूप पैसा आज हाती खेळतो

अर्थ नाही जीवना, आईविना भांबावतो

४३) राधा  (गालगागा × + गा)

मुक्त हस्ते देत जाते राबते आई

नित्यनेमाने घरा सांभाळते आई,

खूप पैसा आज हाती खेळतो आहे

अर्थ नाही जीवनाला, शोधतो आई

४४) संयुत  (गागालगा × )

आई घरा सांभाळते

देवापुढे ओवाळते,

पैसा सुखे हातामधे

आईविना झाकोळते

४५) आनंद  (गागालगा लगागा)

आईमुळे सुगंधी

वाहे घरात वारा,

आईविना सुखाला

नाही मनात थारा

४६) विद्युल्लता  (गागालगा लगागा गागालगा लगा)

आई घरास शोभे मांगल्यता असे

आईविना घराला सौंदर्यता नसे,

पैसा मिळो कितीही गाडी नि बंगला

आईशिवाय दारी संपन्नता नसे

४७) लयग्राहि (गागाल × + गागा)

आई घरी राबता सौख्य आहे

आईविना का कुठे अर्थ आहे?

मी पाहतो फक्त पैसा प्रतिष्ठा 

आईविना सर्वची व्यर्थ आहे 

४८) तारामती (गागाल × + गा)

आई घरी नांदते खेळते

तक्रार ना बोलते सांगते,

मी धावतो फक्त पैसा तिथे 

आईविना व्यर्थची वाटते 

४९) वारकामिनी (गालगाल गालगाल गालगा)

माय देतसे घरास भव्यता

माय राबता घरात दिव्यता,

धावलो कितीक मी सुखासवे

माय सोबतीविना न अर्थ त्या

५०) देवराज (गालगाल गालगाल गालगाल गालगा)

संकटात माय देतसे घरास भव्यता

नित्यनेम माय राबता घरात दिव्यता,

रोजरोज धावलो कितीक मी सुखासवे

माय सोबतीस ना, सुखास काय अर्थ त्या?

५१) पृथ्वी (लगाल ललगा लगा! ललगा लगागा लगा)

जगात ममता महान असते सदा सर्वदा 

इथे घडविते अम्हा सतत माय संस्कारदा,

कितीक फिरलो जरी मिळविले सुखी जीवना

नसेल जर माय का, फुकट ती सुखी संपदा



Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service

PROS

+
Add Field

CONS

+
Add Field
dinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet güncel girişdedebetdedebet girişdedebet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişdinamobetdinamobet girişdinamobet güncel girişmarsbahismarsbahisslot sitelerimarsbahis girişmarsbahis giriş