This is to certify that SHRI. VIJAY JOSHI (VIJO) has been recognized for his remarkable literary accomplishment of composing a series of Marathi poems (Characteristic Lines) on the IMPORTANCE OF MOTHER IN 25 DIFFERENT MARATHI VRUTTA (meter) and set a new World Record on 10th April 2025 at Dombivli, Maharashtra, India. The word “VRUTTAI” (Vrutta + Aai) signifies the content on the subject of ‘Mother’ (Aai) has been creatively expressed across various poetic meters (Vrutta), hence the Project name is “Vruttai”. Poetic meter refers to the rhythmic structure of a verse, determined by the arrangement of stressed and unstressed syllables. In Marathi poetry, meter is known as “Vrutta”, and it plays a crucial role in shaping the flow and musicality of the poem. His dedication to preserving and promoting the richness of Marathi literature through poetic innovation is truly commendable.
“Congratulations on your extraordinary achievement! Your determination, perseverance, and dedication have earned you a well-deserved place in the World Records Book of India. Keep inspiring others with your remarkable accomplishments!”
25 DIFFERENT MARATHI VRUTTA (meter) as in below
- १) अनलज्वाला (८-८-८)
- २) आनंदकंद (गागालगा लगागा * २)
- ३) उद्धव (२-८-४)
- ४) वियदगंगा (लगागागा * ४)
- ५) वनहरिणी (८-८-८-८)
- ६) शार्दुलविक्रीडित (गागागा ललगा लगाल ललगा ! गागाल गागाल गा)
- ७) लवंगलता (८-८-८-४)
- ८) भुजंगप्रयात ( लगागा * ४)
- ९) भूपती (२-८-८-४)
- १०) मंदारमाला (गागाल * ७ + गा)
- ११) हरिभगिनी (८-८-८-६)
- १२) वाघेश्वरी / सुमंदारमाला ( लगागा * ७ + लगा)
- १३) समुदितमदना / सूर्यकान्त (८-८-८-३)
- १४) जलौघवेगा ( लगालगागा * २)
- १५) पतितपावन / चंद्रकान्त (८-८-८-२)
- १६) स्त्रग्विणी (गालगा * ४)
- १७) शुभगंगा (८-८-६)
- १८) सौदामिनी (लगागा * ३ + लगा)
- १९) परिलीना (६-६-६-४)
- २०) मंजुघोषा (गालगागा * ३)
- २१) पादाकुलक (८-८)
- २२) मनोरमा (गालगागा * २)
- २३);वंशमणि (८-८-४)
- २४) बालानन्द / अचलगति (८-६)
- २५) शुध्दसती (८-४)
पहिली आवृत्ती – एकूण १ ते २५ वृत्त
१) अनलज्वाला (८-८-८)
२) आनंदकंद (गागालगा लगागा * २)
३) उद्धव (२-८-४)
४) वियदगंगा (लगागागा * ४)
५) वनहरिणी (८-८-८-८)
६) शार्दुलविक्रीडित (गागागा ललगा लगाल ललगा ! गागाल गागाल गा)
७) लवंगलता (८-८-८-४)
८) भुजंगप्रयात ( लगागा * ४)
९) भूपती (२-८-८-४)
१०) मंदारमाला (गागाल * ७ + गा)
११) हरिभगिनी (८-८-८-६)
१२) वाघेश्वरी / सुमंदारमाला ( लगागा * ७ + लगा)
१३) समुदितमदना / सूर्यकान्त (८-८-८-३)
१४) जलौघवेगा ( लगालगागा * २)
१५) पतितपावन / चंद्रकान्त (८-८-८-२)
१६) स्त्रग्विणी (गालगा * ४)
१७) शुभगंगा (८-८-६)
१८) सौदामिनी (लगागा * ३ + लगा)
१९) परिलीना (६-६-६-४)
२०) मंजुघोषा (गालगागा * ३)
२१) पादाकुलक (८-८)
२२) मनोरमा (गालगागा * २)
२३);वंशमणि (८-८-४)
२४) बालानन्द / अचलगति (८-६)
२५) शुध्दसती (८-४)
# पहिली आवृत्ती – एकूण १ ते २५ वृत्त
१) अनलज्वाला (८–८–८)
संसाराच्या जात्यामध्ये फिरते आई
नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते आई,
जेव्हा असतो घरापासुनी दूर एकटा
असतो पैसा, सर्व सुखे पण नसते आई
२) आनंदकंद (गागालगा लगागा × २)
संसारवेल मोठी आईशिवाय नाही
आई असेल तेथे सर्वार्थ सर्व काही,
जाशील दूर देशा आईविना भिकारी
पैसा सुखे असूनी आयुष्य गोड नाही
३) उद्धव (२–८–४)
संसारसुखाच्या मागे
आईची तळमळ मोठी
जर नसेल आई तेव्हा
ठरतील सुखेही खोटी,
दिमतीला गाडी घोडा
शोधात सुखाच्या पाठी
पण आईशिवाय भासे
जगण्याची रेषा छोटी
४) वियदगंगा (लगागागा × ४)
फिरे जात्यात संसारा जगाची माय माऊली
उरेना अर्थ आयुष्या तसा काही विनाआई,
सुखाला शोधताना तू घराच्या सोडशी भिंती
तुझ्या ना सोबती आई, सुखाला अर्थ ना काही
५) वनहरिणी (८–८–८–८)
आनंदाने संसाराला झोकुन देते झिजते आई
नसते जेव्हा सोबत तेव्हा क्षणाक्षणाला स्मरते आई,
किती कमविला पैसा अडका इमला गाडी सुखासीनता
कवडीचेही मोल न त्याला जेव्हा सोबत नसते आई
६) शार्दूलविक्रीडित
(गागागा ललगा लगाल ललगा ! गागाल गागाल गा)
आईचा असतो घरी दबदबा सर्वत्र कामावरी
आईचे कळते महत्त्व सकला जेव्हा नसे ती घरी,
विश्वासे उडलो किती जगभरे ऐश्वर्य संपादण्या
आयुष्यी सगळी सुखे मिळविली, आईविना ना खरी
७) लवंगलता (८–८–८–४)
संसाराच्या चक्रामध्ये भरडत असते आई
नसते जेव्हा सोबत माझ्या तेव्हा कळते आई,
किती कमविला पैसा अडका सुखी जीवनासाठी
अर्थ न काही अशा सुखाला जेव्हा नसते आई
८) भुजंगप्रयात (लगागा × ४)
किती माय राबे घराच्या सुखाशी
कुणी झोपते ना कधीही उपाशी,
नसे माय जेव्हा घरा उंबऱ्याशी
कळे माय मोठी असे लेकरांसी,
किती धावलो मी सुखे शोधताना
तरी माय मोठी सुकीर्ती जगाशी
९) भूपति (२–८–८–४)
ती आई असते संसाराशी फिरते
ती नसते जेव्हा सोबत तेव्हा कळते,
मी असतो जेव्हा घरापासुनी दूरऽ
मज मिळतो पैसा परंतु आई नसते
१०) मंदारमाला (गागाल × ७ + गा)
आई सदा राबते उंबऱ्याशी कुटुंबा सुखाचा दिवा लावते
लावी किती लोभ माया मुलांशी जरा दूर जाता सुने वाटते,
धावे जगी दूर देशा सदा मी सुखे मोह माया मिळाली मला
आई नसे सोबतीला घराला अशी मोह माया मना बोचते
११) हरिभगिनी / स्वर्गङ्गा (८–८–८–६)
संसाराच्या जात्यामध्ये आई भरडत असताना
आई कळते आम्हा जेव्हा घरात सोबत नसताना,
किती कमविला पैसा अडका जीवन सुखकर बनवाया
अशा सुखाला अर्थ न काही सोबत आई नसताना
१२) वागेश्वरी / सुमंदारमाला (लगागा × ७ + लगा)
जगी माय मोठी इथे रोज राबे घरा उंबऱ्याशी दिवा लावते
किती लोभ माया गुरावासरांशी जरा दूर जाता सुने वाटते,
सदा धावतो मी जगी दूर देशा सुखे मोह माया मिळाली जरी
नसे माय माझी इथे सोबतीला अशी मौज मस्ती मना बोचते
१३) समुदितमदना / सूर्यकान्त (८–८–८–३)
संसाराचे जाते अवघड आई फिरवत बसे
आई कळते आम्हा जेव्हा घरासोबती नसे,
किती कमविला पैसा अडका जीवनसौख्या जरी
आई नसता अर्थ न उरतो सारी दुनिया हसे
१४) जलौघवेगा (लगालगागा × २)
घरात आई कितीक राबे
अनेक वर्षे अनेक मासे
तिने जराशी उसंत घेता
उणीव तीची घरास भासे,
कितीक पैसा मला मिळाला
सुखे जरीही घरात आली
महत्त्व त्याचे उरे न काही
घरात जेव्हा नसेल आई
१५) पतितपावन / चन्द्रकान्त (८–८–८–२)
संसाराच्या चक्रामध्ये आई फिरताना
आई कळते आम्हा जेव्हा घरात नसताना,
किती कमविला पैसा अडका जीवनसौख्याला
अशा सुखाला अर्थ न उरतो आई नसताना
१६) स्त्रग्विणी (गालगा × ४)
आपुली माय ती सारखी राबते
दु:ख ना बोलते ना कुणा सांगते
ती घरापासुनी दूर गेली कधी
का तिच्यावाचुनी एकटे वाटते?
दूर देशामधे खूप पैसा मिळे
मीच श्रीमंत मी वाटतो त्या तिथे
सोबती माय ना मी असे एकटा
मोल नाही कशा माय नाही जिथे
१७) शुभगङ्गा (८–८–६)
संसाराशी आई भरडत असताना
आई कळते घरात सोबत नसताना,
पैशासाठी जगभर फिरलो उगाच मी
अर्थ न त्याला आई सोबत नसताना
१८) सौदामिनी (लगागा × ३ + लगा)
किती माय राबे घरा पाहते
नसे माय जेव्हा सुने भासते,
किती धावतो मी सुखा शोधतो
परी माय नाही उणे वाटते
१९) परिलीना (६–६–६–४)
संसारी जात्याला गुरफटते आई
घरामधे नसताना आकळते आई,
पैशाच्या मागे मी दूर दूर धावे
अर्थ नसे पैशाला जर नसते आई
२०) मंजुघोषा (गालगागा × ३)
राबुनी आई घराला प्रेम देई
प्रेमभावे ती मुलांना सर्व देई,
खूप पैसा लोभ माया आज आली
माय नाही जीवनाला अर्थ नाही
२१) पादाकुलक (८–८)
संसाराच्या चक्रामध्ये
आनंदाने फिरते आई
नसते जेव्हा सोबत तेव्हा
मनास छळते कळते आई,
किती कमविला पैसा अडका
सुखी जीवना करण्यासाठी
अर्थ न काही अशा सुखाला
जेव्हा सोबत नसते आई
२२) मनोरमा (गालगागा × २)
राबुनी आई घराला
देत जाते सर्व काही,
खूप पैसा आज आहे
माय नाही, अर्थ नाही
२३) वंशमणि (८–८–४)
संसाराशी आई भरडत असते
नसते आई सोबत तेव्हा कळते,
पैशासाठी जगभर उगाच फिरलो
अर्थ न त्याला आई सोबत नसते
२४) बालानन्द / अचलगति (८–६)
संसाराच्या जात्याला
आई भरडत असताना,
आई कळते आम्हाला
जेव्हा सोबत नसताना;
किती कमविली संपत्ती
जीवन सुखकर घडवाया,
आईशिवाय जगण्याला
अर्थ नसे सारे वाया
२५) शुद्धसती (८–४)
आई संसाराच्या
नात्यांमध्ये फिरते,
नसते सोबत जेव्हा
तेव्हा आई कळते;
आईशिवाय जेव्हा
दूर एकटा असतो,
सर्व सुखे असताना
केविलवाणा होतो

Leave feedback about this